Sunday, April 19, 2020

दिलासादायक! ‘त्या’ कोरोनाग्रस्त ट्रक ड्राइवर च्या संपर्कात आलेले 18 जणांचे टेस्ट निगेटिव्ह

दिलासादायक!  ‘त्या’ कोरोनाग्रस्त ट्रक ड्राइवर च्या संपर्कात आलेले 18 जणांचे टेस्ट निगेटिव्ह


त्या सर्व पोलिस व आरटीओ एकूण 18 ची घबरदारी म्हणून केली होती तपासणी



नांदेड़ (प्रतिनिधि)
 दोन दिवसा अगोदर भोकर तालुक्यातील  महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ असलेल्या चेक पोस्ट वरुण आम्बे भरलेला ट्रक घेऊन बुलढाना जिल्ह्यामध्ये एक ट्रक गेला होता तो कोरोना पॉझिटिव्ह होता दि.16 ते 18 एप्रिल दरम्यान कर्तव्यावर असलेल्या 3 पोलीस अधिकारी,9 पोलीस कर्मचारी,2 होमगार्ड व 1 स्वयंपाकी,तर आर.टी.ओ. विभागाचे 1 अधिकारी व 2 कर्मचारी अशा एकूण 18 जणांचा कोरोना पॉजिटिवच्या  संपर्कात आले नाही तरी पण संभाव्य संपर्क संशयावरुन खबरदारी म्हणून प्रथम भोकर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीसाठी सायंकाळी नांदेड येथील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी येथे पाठविण्यात आले होते. सदरील सर्वांना कोरोना तपासणीस सामोरे जावे लागले होते  त्यांचे स्कॅब नमुने घेण्यात आले होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलकंठ भोसिकर यांनी दिल होती आज रोजी त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची दिलासादायक माहिती भोकर तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांनी दिली आहे


सविस्तर बातमी अशी की विभाग तपासणी नाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना ही कागदपत्रे दाखऊन आंब्याने भरलेला  ट्रक घेऊन ते बुलढाणा जिल्ह्यात गेला होता सदरील होम क्वॉरंटाईन ट्रक चालकाचे स्कॅब तपासणीसाठी तेलंगणाच्या संबंधीत कोरोना यंत्रणेने पाठविले होते.त्या तपासणीत तेलंगणा राज्य कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक यंत्रणेस तो ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे तेथील यंत्रणा खडबडून जागी झाली व त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी नव्हता तर आंबे घेऊन महाराष्ट्रात गेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.यावरुन तेलंगणा पोलीसांनी महाराष्ट्र यंत्रणेस संपर्क साधला व त्या व्यक्तीपासून सतर्क राहण्याबाबद माहिती दिली होती.


.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता तो ट्रक भोकर तालुक्यात येत आल्याचे समजल्यावरुन तेलंगणा पोलीसांनी नांदेड व भोकर पोलीसांना ही माहिती दिली.या माहिती नुसार सदरील तपासणी नाक्यावर तो ट्रक सकाळी अडविण्यात आला होता.यावेळी भोकरचे पो.नि. विकास पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहूल वाघमारे हे तात्काळ तपासणी नाक्यावर गेले आणि त्या ट्रक चालकाची,त्याच्या सहाय्यकाची चौकशी केली. यावेळी तो ट्रक चालक व त्याचा सहाय्यक या दोघांनी ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातून कांदे आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले होते.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 18 जणांचे तपासणी अहवाल स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी प्रयोगशाळेमध्ये पाठवले असता त्या सर्व 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच चेक पोस्टवर कसून तपासणी करण्यात येत आहे .जिल्ह्यात चोरून लपून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून अशा व्यक्तींना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...