Wednesday, April 8, 2020

आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना जेवण मोफत

आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना जेवण मोफत वाटप
 

   


भोकर (एजास कुरेशी)
आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटप कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राहणीमान कोलमडून गेले आहे. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र दुकाने बंद आहेत. या कालावधीत ज्यांना रोज कष्ट करून दररोज आपल्या कुटूंबाचे पोट भरावे लागते अश्या गरीब व गरजू नागरिकांची जेवणाची गैरसोय होत आहे. अशा गरजू, गरीब नागरिकांसाठी आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे, रोज एक हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटप ,एक हात मदतीचा – एक हात माणुसकीचा उपक्रमा’ द्वारे जेवण वाटप करण्यात येत आहे.




गरीब व गरजू नागरिकांची लॉक डाऊनमुळे जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे रोज एक हजार गरजू लोकांना जेवण वाटप करण्याचा उपक्रम हे देशात लॉक डाऊन सुरू झाल्या पासून ते आज पर्यंत सुरू आहे व तसेच लॉक डाऊन संपेल तो पर्यंत सुरू राहील असे आश्वासन आसिफ भाई मित्रमंडळ तर्फे देण्यात आले आहे
हा उपक्रम भोकर शहरातील युवा कार्यकर्ते आसिफ भाई मित्रमंडळ ग्रुप तर्फे गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संपूर्ण देशात संचारबंदी असताना गरजू लोकांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी सामाजिक भावनेतून हा उपक्रम आसिफ भाई  ग्रुप तर्फे राबवण्यात येत  आहे…..



No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...