पीर बुऱ्हाण चे सर्व रास्ते सील प्रशासनाला सहकार्य करा पोलीस निरीक्षक कदम
नांदेड -- पीर बुऱ्हाण नगर कडे जाणारे सर्व रस्ते पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा मोडू नये असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.
कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहे त्यात साथ रोग कायदा लागू करण्यात आला आहे. शहरातील पिरबुऱ्हान नगर भागात एक रुग्ण आढळून आल्या नंतर मा. पोलीस अधीक्षक मगर यांना प्राप्त अधिकारानुसार व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार वर्कशॉप कॉर्नर ते आनंद नगर व राज कॉर्नर ते शिव मंदिर या मार्गावरून पीर बुऱ्हाण नगर कडे जाणारे सर्व रस्ते कोणतीही वाहतूक करण्यास बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर रस्त्यावर येऊ नये असे आवाहनही कदम यांनी केले आहे. पोलीस कर्मचारी ऊन व कसल्याही संकटाची तमा न बाळगता रस्त्यावर सेवा बजावत आहेत त्या मुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment