Wednesday, June 3, 2020

बिग ब्रेकिंग:-नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागात आज तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह,

बिग ब्रेकिंग:-नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागात आज तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह,




नांदेड़ (प्रतिनिधि)
नांदेड़;- बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात तब्बल २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. या ठिकाणी डॉक्टर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे उर्वरित त्याच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक आहेत. त्याचबरोबर शिवाजीनगर भागातील नई आबादी येथील नऊ रुग्ण आढळून आले आहेत. बाधित कामगार कुटुंबातील त्याचे सदस्य व नातेवाईक आहेत. तसेच आमदापुर (ता. देगलूर) येथे एक नवीन रूग्ण आढळून आला आहे.

कोरोना संशयितांचा स्वॅब तपासणी अहवाल बुधवारी (दि. ३) प्राप्त झाल्यानंतर खळबळ उडाली असून सकाळी दोन तर सायंकाळी २१ असे दिवसभरात २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या १७५ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असताना आणि अनेकजण बरे होऊन घरी जात असताना बुधवारी (दि.३) धक्कादायक घटना घडली आहे. दिवसभरात तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ वर गेली आहे. बुधवारी संध्याकाळी १३२ अहवाल प्राप्त झाले असून त्यात २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नाकारलेले नमुने सहा तर अनिर्णित सहा आहेत. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच जनतेने आपल्या मोबाईलवर 'आरोग्य सेतू ॲप' डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...