नियमांचे ऊल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांना महसूल व पोलीस प्रशासनाने ठोकले सील.
भोकर/प्रतिनिधी
नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गर्दी न करण्याच्या अटीवर दुकाने व इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिलेले असतांना देखील भोकर शहरात नियमांचे उल्लंघन करीत अनेक दुकानदार आपले व्यवसाय बिनधास्तपणे वेळ संपल्यानंतर देखील सुरु ठेवत असल्याने तहसिल महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने आज सहा दुकाने सील केले आहे
त्यात 1)विलास कृषीसेवा किनवट रोड 2)बालाजी स्टील दुकान आंबेडकर चौक 3) ताज मोबाईल शॉप नांदेड रोड 4) राजधानी फर्निचर मार्ट 5) श्रीराम ऑटोमोबाईल नांदेड रोड 6) राजेश कृषी सेवा तहसील समोर असे एकूण सहा दुकाने सील करण्यात आलीआहे.
भोकर च्या व्यवसायांकाना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत नियम व अटींच्या अधीन राहून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे त्या नुसार 1 जून पासून अनेक व्यवसायांना सूट मिळाली परंतु भोकर शहरात जिल्हाधिकारी आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत असून काही दुकानदार वेळेचे बंधन न पाळता आपला व्यवसाय बिनधास्तपणे करीत आहे तर काही दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे
त्यामुळे शहरातील 6 दुकाने प्रशासनाने सील केले आहे. ठरलेल्या वेळेनंतरही दुकान चालू ठेवण्याची कारण आहे. दुकान सील करुन लॉकडाऊन उल्लंघन केल्याची कार्यवाही केली आहे. संध्याकाळी 5 नंतरही दुकानदाराने चालू ठेवल्यामुळे भोकर चे उपजिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार पथक प्रमुख सतिश जोहर, सोबत बी.के.राऊत,गोविंद राचेवाड,नगर परिषद तर्फे सचिन वैष्णव,व पोलीस प्रशासन तर्फे बिरकलवाड, यांची पथक घटनास्थळी जाऊन तपास केला असता प्रकरण योग्य असल्याचे समजले. गांभीर्य पाहून दुकान लगेचच सील केले. लॉक डाऊन चा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आपण सवलत देत असल्यास, त्याचा फायदा घेऊ नका. जिथे असे दुर्लक्ष होईल तेथेही कारवाई केली जाईल.असे निर्देश नायब तहसीलदार सतिश जोहर यांनी दिले आहे

No comments:
Post a Comment