Tuesday, June 2, 2020

हातगाडे फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पदी मंसूर खान पठाण यांची निवड

हातगाडे फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पदी मंसूर खान पठाण यांची निवड





भोकर (प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षांपासून  छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत आहे  त्यांच्यावर सतत अन्याय होत असतो यांना वेळोवेळी दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात येते म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असते पहिलेच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक संगठना बनवण्यात अली आहे त्या संघटनेचे अध्यक्ष म्हनून मन्सूर खान पठाण, तर उपाध्यक्ष शेख जाहीर, यांची निवड करण्यात आली आहे

 भोकर तालुक्यात तसेच शहरात हात गाडी चालवून फळ व जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते असंघटित असल्यामुळे त्यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार होतो म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, यांच्या निवासस्थानी हात गाडी फळ जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या लोकांची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय संदर्भात चर्चा करण्यात आली या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी एक संघटना व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांचे विश्वासू मंसूर खान पठाण कोळगावकर, यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष शेख जहीर, सचिव शेख गौस,यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, माजी नगरसेवक करीम बागवान, व तसेच माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, यांनी स्वागत केले यावेळी शेख नसीर भाई, शेख फयाज भाई, बाळूमामा, ललिताबाई खांडरे, नागोराव, रहमान भाई, मोहम्मद अन्सार, जब्बार पठाण, शेख मुसा, मोहम्मद नवाब, शेख गौस शेख चांद, यांची उपस्थिती होती.




मन्सूर खान पठाण  कोळगावकर

आज पासून कोणत्याही फळ विक्रेतेवर अन्याय होऊ देणार नाही प्रशासना फळ विक्रेत्यावर व हातगाडे वर उदरनिर्वाह करणाऱ्यावर अन्याय करू नये अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आज पासून कोणत्याही हातगाडा असो का फळ विक्रेत व भाजीपाला विकणाऱ्या गरीब जनतेला मी आव्हान करतो कोणावर ही कोणताही अधिकारी विनाकारण अन्याय करत असेल तर मला कळवावे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हात गाड्यावर फळविक्रेते त्यांना न्याय मिळवून देईल:- मन्सूर खान पठाण  कोळगावकर

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...