माजी नगरसेवका विरुद्ध ॲट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा दाखल
भोकर (प्रतिनिधी)
भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी नगरपालिकेच्या कार्यालयीन कर्मचारी व घन कचरा उचलणाऱ्या गुत्तेदाराला खंडणी पोटी धमकावून रक्कम मागितल्याची तक्रार देण्यात आली आहे.
याप्रकरणी भोकर पोलिसात माजी नगरसेवका विरुद्ध खंडणी व आत्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोकर नगर परिषद अंतर्गत शहरातील घनकचरा उचलणारे गुत्तेदार यशवंत ज्ञानोबा प्रधान हे दिनांक 4 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भोकर नगर परिषदेतील कामकाज आटोपून बाहेर निघाले यावेळी नगरपालिकेच्या गेट समोर माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी त्यांना अडवून तू मागील दीड वर्षापासून घन कचरा उचलण्याची गुत्तेदारी करतो, पण तू आज पर्यंत एकही रुपया दिला नाहीस, मागील कामाचे दीड लाख रुपये दोन दिवसात दे, व प्रतिमाह 50 हजार रुपये दे, नाहीतर टेंडर मिळू देणार नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच भोकर नगर परिषदेतील कार्यालयीन कर्मचारी साहेबराव मोरे हे दिनांक 4 जून रोजी 2:30 च्या दरम्यान कार्यालयीन कामकाज करीत असताना त्याठिकाणी माजी नगरसेवक आले व त्यांनी साहेबराव मोरे यांना मी माहिती अधिकार टाकलेल्या कामाची माहिती अद्याप का दिली नाही अशी विचारणा केली यावेळी साहेबराव मोरे यांनी सध्या लॉक डाऊन आहे व मी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या कामात असल्याने विलंब झाला असला तरी मी लवकरच माहिती देईल असे सांगितले तेव्हा मुद्देवाङ यांनी साहेबराव मोरे यांना जातिवाचक शिवीगाळ करून झटापटी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. उपरोक्त प्रकरणी गुत्तेदार यशवंत प्रधान व साहेबराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अ.जा.अ.ज. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत शासकीय कामात अडथळा व खंडणीचा गुन्हा भोकर पोलिसात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बी मुदीराज हे करीत आहेत

No comments:
Post a Comment