Sunday, June 21, 2020

ब्रेकिंग:.कोरोना पोहचला महापालिकेत! माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त

ब्रेकिंग:.कोरोना पोहचला महापालिकेत!
माजी महापौर व नगरसेवकासह चार जण कोरोनाग्रस्त


नांदेड (प्रतिनिधी)
नांदेडचे माजी महापौर आणि त्यांचे नगरसेवक पूत्र दोघांसह एकूण 4 जण कोरोना बाधीत झाले  आहे.
- नांदेडच्या बिलालनगर भागातील ५७ व ३७ वर्षीय पुरुष
- धोत्री गल्ली, गाडीपुरा, नांदेड येथील ४० वर्षीय पुरुष
- रहेमतनगर येथील २२ वर्षीय तरुण

आज च्या माहितीनूसार 14 स्वँब अहवाल प्राप्त झाले.त्यात 4 कोरोना बाधीत आहेत.9 अहवाल निगेटीव्ह आहेत.एक अहवाल अनिर्णित आहे.पाँझीटिव्ह लोकांमध्ये सर्व 4 पुरुष आहेत. एक रहमतनगर- 22 वर्ष,एक धोत्री गल्ली – 40 आणि बिलालनगरचे 57 आणि 36 वर्षीय दोन पुरुष आहेत.आता एकूण कोरोना बाधीत रुग्ण संख्या 308 झाली आहे

+नगरसेवक व अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ

या चौघांमध्ये माजी महापौर आणि आजचे नगरसेवक सोबत त्यांचे नगरसेवक पूत्र सहभागी आहेत.त्यांनी आपल्या भागातील कंटेंनमेंट झोन मध्ये खूप मेहनत घेतलेली आहे.त्यामूळे सेवा करतांना कोरानाशी त्यांची कुठेतरी भेट झालीच असणार.आता मनपा सुध्दा कोरोना बाधेत आली आहे.आता मनपाच्या अनेक नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी कोरोना संशयीत होणार आहेत.

+ जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ३०८
+ बरे करून घरी सोडले: २१९
+ उपचार सुरू: ७५
+ मृत्यू: १४

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...