Thursday, June 4, 2020

टायगर ऑटोरिक्षा संघटनाच्या वतीने ऑटो चालकांना राशन किट वाटप

टायगर ऑटोरिक्षा संघटनाच्या वतीने ऑटो चालकांना राशन किट वाटप




नांदेड:- (एजास कुरेशी)
नांदेड येथील ऑटो रिक्षाचालकांचे व मालकांचे खूप दयनीयअवस्थाझालीआहे. हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा जगण्याचा प्रश्न गंभीरबनला आहे.

या परिस्थितीत ला समजून नांदेड येथील टायगर ऑटो रिक्षा संघटनाच्या वतीने चालकांना राशन किट वाटप करण्यात आले आहे. फुल नाही फुलाची पाखळी म्हणून छोटीशी मदत करण्यात आली लॉक डाऊन काळात बरेच चालक आत्महत्या करत आहेत  त्यात काही चालकांचे विधवा महिला आहेत त्यांना पण टायगर ऑटो संघटना च्या वतीने राशन किट वाटप करण्यात आले आहे.
सरकार ने पण मदत करावी असे मागणी टायगर ऑटो संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी केली आहे.व संघटनेत काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेचा आभार मानला आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...