Monday, June 15, 2020

नियमांचा उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व दुकानांवर कार्यवाही ३७०० दंड वसुल

नियमांचा उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व दुकानांवर कार्यवाही ३७०० दंड वसुल
                 

भोकर (प्रतिनिधी)
  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या भोकर येथील आठ हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून महसूल विभाग आणि नगरपरिषदेने आज सामूहिक दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हॉटेल वेवसायक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या भोकर शहरात सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे दुकानदारही नियम पाळत नसून लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन होत आहे. नियमा बाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्यांना ऑनलाईन तसेच फोनवरुन मालाची मागणी स्वीकारुन ती पुरवावी. जेणेकरुन बाजारात ग्राहकांची एकच गर्दी न होता ही रोखले जाईल. तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळही दिली आहे. परंतु, नियमाचे पालन न केल्यामुळे भोकर येथील  व्यवसाय करणाऱ्या बायपास रोड वरील डोंगरे हॉटेल, नगर परिषद समोरील चंदा हॉटेल, बस स्टॅंड जवळील नरसिंह हॉटेल, आंबेडकर चौक येथील मराठवाडा चिकन बिर्याणी, यांच्यासह वडापाव विकणाऱ्या हात गाड्यावर सुद्धा आज दिनांक १५ जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद कार्यालय भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण ८ हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ हजार ७०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

  या कार्यवाही मध्ये भोकर नगर परिषद येथील मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,नायब तहसीलदार पोहरे,व लिपिक राऊत, व वैष्णव,  आदि उपस्थित होते व तसेच सर्व  व्यापाऱ्यांनी ५ वाजता दुकान बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...