Friday, June 5, 2020

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपाशी मरणाची आली वेळ..! म्हणून आंबा नगर येथील युवकांने गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपाशी मरणाची आली वेळ..! म्हणून आंबा नगर येथील युवकांने गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!


                                                                     

हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून एका जेसीबी चालकाची आत्महत्या                           



नांदेड (ए एम कुरेशी)
अंबानगर सांगवी येथील दत्ता उकंटी खिल्लारे यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ माधव उंकटी खिल्लारे (३९) हा जेसीबी चालक म्हणून काम करत होता. पण जवळपास तीन महिन्यापासून कांहीच काम नसल्याने घराचा गाडा कसा चालवावा या चिंतेत त्याने ३ जून रोजी पहाटे ३ ते ४ या वेळेदरम्यान आपल्या घरातील कडीला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. विमानतळ पोलीसांनी या संदर्भाने आकस्मात मृत्यू दाखल केला असून पोलीस नाईक गोवाडे अधिक तपास करीत आहेत.

, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला जेसीबी चालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला होता. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले होते. चालकांवर अवलंबून असणारे त्याचे कुटुंब काटकसरीने दिवस काढत होते. जगण्याचा प्रश्न गंभीरबनला होता म्हणून त्यांने जीवनच संपवला.


भारत सरकारने लॉक डाऊन केल्यामुळे आज जवळपास ९० दिवसांपासून हाताला काम नाही उपासमारीची वेळ आली आहे  माझ्याच खाण्यापिण्याचे वांदे होत असल्यामुळे मी दोन मुले पत्नी  इतक्या जीवाची कशी  वेवस्था करू या निराशेतून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली  हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केली असल्यामुळे नांदेड शहर हळहळ व्यक्त होत आहे लॉक डॉऊन मध्ये आत्महत्या करणारा हा जेसीबी चालक जिल्ह्यात तिसरा व्यक्ती आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...