कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; आरोग्य सेवेवर होणार परिणाम
शासकीय सेवेत समायोजन करू घेण्याची मागणी
भोकर:-(एजास कुरेशी)
तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी तत्वावर असलेल्या कर्मचारीना कायमस्वरूपी करा म्हणून मागणी करत काम आंदोलन केले आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य विभागावर झाला आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर व कमी मानधनावर काम करत आहेत पण आद्यपर्यंत त्यांचे समायोजन झाले नाही.कोव्हिडं 19 मध्ये या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे व मानधन मात्र अल्प प्रमाणात मिळत आहे.वैद्यकीय अधिकारी यांचे मानधन मात्र मुख्यमंत्री यांनी वाढवले असून कंत्राटी लोकांकडे दुर्लक्ष केले आहे,तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे शासनाला आमची गरज नसल्यास,आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचार्यांमध्ये दिसुन येत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता पडताळून त्यांचे सम कक्ष रिक्त असलेल्या पदावर त्वरित समायोजन करावे अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर जाधव सुधाकर,बंडावार अंजना सह अनेक आरोग्य सेविका आदीच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे.भोकर तालुक्यातील एकूण ३२ आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर होऊ शकतो.

No comments:
Post a Comment