Friday, June 12, 2020

लॉकडाऊनमुळे नांदेडमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..:-अहेमद बाबा बागवाले

लॉकडाऊनमुळे नांदेडमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..:-अहेमद बाबा बागवाले



नांदेड:- (एजास कुरेशी)
ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन मुळे त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा जगण्याचा प्रश्न गंभीरबनला आहे.
त्यांतच अत्ता
 रिक्षाचे हप्ते कसे भरायचे. बँक कार्पोरेशन बँक बचत गट फायनान्स कंपनी बजाज कंपनी व इतर खाजगी फायनान्स लाईट बिल विना व्याज पाच महिन्यांची पैसे भरण्याची सवलत देण्यात यावी कारण रिक्षा चालू असून बंद असल्यासारखे आहे
 लॉक डाऊन लागल्यामुळे रिक्षाचालकांचा तीन महिन्यापासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे नांदेड मध्ये रिक्षाचालकांना रिक्षा चालवण्याची परवानगी दोन प्रवासी साठी देण्यात आलेली आहे नांदेडमध्ये पंधरा हजार रिक्षाचालक आहेत सध्याच्या परिस्थितीत रेल्वे बंद आहे ,बस बंद आहे, कॉलेज बंद आहे ,टिहीशन  बंद ,आहे ग्रामीण भागातील प्रवासी बंद आहे ,व इतर घटक बंद असल्या कारणाने व कोरोनाच्या भीती कारणांनी रिक्षाचालकांना प्रवासी साठी कसरत करावी लागत आहे रिक्षा रोड वर तर दिसत आहे आमदनी मात्र काहीच नाही रिक्षाचालकांची दयनीय अवस्था झालेली आहे सध्याच्या परिस्थितीत रिक्षाचालकांची पोटाची खळगी भरणे कठीण झालेले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे फेडणार बँकेचे कर्ज, खाजगी कज, खाजगी फायनान्स, बचत गट ,लाईट बिल, कसे भरणार लॉक डाऊन लागून जवळपास तीन महिने लोटलेले आहेत  रिक्षाचालक 80% घरासमोर उभे आहेत. सध्याच्या परिस्थितीत रिक्षाचालकांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. असेच राहिले तर  रिक्षाचालक पण शेतकरी प्रमाणे आत्महत्या करतील दोन रिक्षाचालकाने आत्महत्या केलेली पण आहे. गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे ऑटोरिक्षा घराच्या दारातच उभी करावी लागत आहे. कोरोना संकटात संचारबंदी लागू केल्याने रिक्षाचं चाक न फिरल्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा हे आता थांबला आहे.
त्यामुळे रिक्षाचालकांचे घराचे आर्थिक मीटरचा जणू काही डाऊन झाले आहे. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या परिस्थितीत ला समजून नांदेड येथील टायगर ऑटोरिक्षा संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले, यांनी जिल्हाधिकारी कडे दाद मागितली आहे टायगर ऑटोरिक्षा युनियन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना अर्ज दिला आहे जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देऊन गरीब ऑटो वाल्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...