Wednesday, June 17, 2020

कावीळच्या आजारामुळे पोलीस कर्मचारी अडबलवार यांचा मृत्यू

कावीळच्या आजारामुळे पोलीस कर्मचारी अडबलवार यांचा मृत्यू




नांदेड (प्रतिनिधी)
 नांदेड : कावीळ आणि लिव्हरच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आजारी असलेल्या एका ५३ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू झाला. ही घटना बुधवार १७ जून रोजी सकाळी नांदेडच्या 'हडको' परिसरात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नाईक पोलीस कॉन्स्टेबल मारोती राजबा अडबलवार-उंद्रीकर हे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून कावीळ आणि लिव्हरच्या त्रासाने आजारी होते. दरम्यान, नाईक पो. कॉ. मारोती अडबलवार यांचा १७ जून रोजी सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान, नवीन नांदेड परीसरातील हडको भागातील श्रीराम मंदिराजवळील त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार सपोउपनि. सय्यद महेमुद व मदतनीस पो. कॉ. नितीन धुळगंडे यांनी दिली आहे.
दिवंगत नाईक पो. कॉ. मारोती अडबलवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन मुले, एक भाऊ, भावजय, पुतणी आणि पुतण्या असा मोठा परिवार आहे.
याप्रकरणी राहूल मारोतीराव अडबलवार यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक पो. कॉ. महेंद्र कौठेकर व त्यांचे सहकारी कर्मचारी हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

1 comment:

  1. Casinos Near You: What You Need to Know Before You
    Where to go betting to find 포커하는법 a place to stay near Casino Lake Tahoe? 인디언 포커 Find it at the best casino in Reno? Find out which 토토 하는 법 casinos have the 안전 사이트 best

    ReplyDelete

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...