मंत्री अशोक चव्हाण यांनी केली कोरोना वर मात लवकरच घरी परतणार..!!
नांदेड (प्रतिनिधी)
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना करोनाचा संसर्ग झाला होता. ते आता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, ते लवकरच घरी येत आहेत. त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी डॉक्टरांनी पुढील एक महिना सक्तीची विश्रांती करण्यास सांगितले आहे. या काळात मला कुणीही भेटायला येऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असं देखील ते म्हणाले.
त्यांच्यावर मुंबई येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले
कोव्हिड पॉझिटिव्ह ड्रायव्हरच्या संपर्कात आल्यामुळं अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बरे झाल्यानं नांदेड सह अशोक चव्हाण यांचा मतदान संघ भोकर येथील सर्व कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला
आहे.

No comments:
Post a Comment