Monday, June 22, 2020

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ

धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ



धर्माबाद (ता. प्रतिनिधी)
 : कोरोना व्हायरसचा धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण कलावंतांना फटका बसला असून,  चार महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने लग्न, जंयती,कव्वाली, लोकनाट्य, भजन,सप्ते, , यात्रा  इत्यादी रद्द झाल्या आहेत. धर्माबाद तालुक्यातील   गेल्या चार महिन्यात  भिमजंयती शिवजयंती, लग्न मध्ये मंगल अस्टकाचे आँरकेस्ट्रा व बँन्ड पथकाचे वाजयंत्री बंद आसुन 
आजही लग्नात व कोणत्याही शुभ कार्यात ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे,  काही मंगल आस्टका व बँन्ड पथक मालकांनी मात्र  काही कलावंतांना कामासाठी  कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा परिस्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.

कोरोना महामारी च्या काळात एकही कार्यक्रम झाला नाही.२२मार्च नंतर कोरोनाचे संकट आले
 कोरोनामुळे या ग्रामीण कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कलावंतांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही या चार महिन्यात पुर्णपणे वर्षाची होनारी आर्थिक परिस्थिती बिकट आसुन कलाकार आर्थिक संकटात सापडला आहे करिता शासनाने ग्रामीणव शहरी कलवंताना आर्थिक मदत द्यावी म्हणून धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिन्दे यांना निवेदन देण्यात आले यावर  भीमशाहीर नारायण सोनटक्के ,प्रकाश खंडेलोटे,विजय हातागळे,राज मिसाळे,चंद्रकांत आमिठवाड,भिमराव खंडेलोटे वैभव हानंमते,शंकर जिवालकर इत्यादी कलाकारांच्या  सह्या आहेत.

  

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...