भोकर तालुक्यात दहावीच्या परीक्षा सुरळीत
फाईल फ़ोटो
तालुक्याच्या नियंत्रण कक्षाकडून परीक्षेवर नजर
भोकर (प्रतिनिधी)
तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचे 2066 विद्यार्थी परीक्षा देत असून आज( दि ०३ )मंगळवार रोजी मराठीचा पेपर कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ डी.एस मठपती यांनी दिली आहे.
तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी पासून कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा पार पडावेत यासाठी तालुका प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.तालुक्यातल्या सहा परीक्षा केंद्रावर भरारी व बैठे पथके निर्माण करून नजर ठेवण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण परीक्षा परिसर कैद केला जात आहे. परीक्षा केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यावर नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे याद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती, अनुपस्थिती, व परीक्षेतील कॉपी प्रकार, तोतयागिरी याबद्दल केंद्र संचालकांकडून, कडून वेळोवेळी माहिती घेऊन वरिष्ठांना कळविले जात आहे. एकूणच आज तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिला पेपर कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडला आहे.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जि प हा भोकर -३५०, मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय-३९१, श्री शाहू महाराज विद्यालय-४००, श्री लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालय-४३० , आश्रम शाळा साळवाडी-२३९ ,कै.ल.पा विद्यालय लगळुद-२५६ असे मराठी, इंग्रजी, उर्दू ,माध्यमाचे एकूण २०६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडत असल्याचे पाहून पालक समाधान व्यक्त करत आहेत.

No comments:
Post a Comment