Tuesday, March 31, 2020

नांदेडच्या त्या संशयित रुग्णाची चाचणी आली निगेटिव्ह नांदेड कराणो घाबरून जाऊ नका

नांदेडच्या त्या संशयित रुग्णाची चाचणी आली निगेटिव्ह नांदेड कराणो घाबरून जाऊ नका






नांदेड :-(एजास कुरेशी)
   उमरी तालुक्यातील अब्दुलापुरवाडी येथे कोरोना संशयित रुग्ण आढळला होता पुण्याहुन नायगावला आल्याने होमकोरोनटाईन करण्यात आले होते. मात्र त्याला सर्दी, ताप, खोकला , श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतानाचे हे सर्व लक्षण आढळुन आल्याने त्यास नांदेडला ऑक्सिजन लावुन हलविण्यात आले होते . नायगाव येथील एक ३० वर्षीय तरुण पुणे येथे कामासाठी होता. तो २१ मार्चला पुण्याहुन नायगाव येथे आला असता त्याला हातावर शिक्का मारुन होम कोरोनटाईन करण्यात आले तरी पण तो घरात न राहाता नायगावाहुन सासरवाडीला  उमरी तालुक्यातील  अब्दुल्लापुरवाडी येथे आठ दिवस राहिला मध्यंतरी तो नायगावला अंत्यविधीला जावुन पून्हा आला होता यातच त्याला तीन चार दिवसापासुन ताप,सर्दी , खोकला येत होता. दि ३० मार्च रोजी पहाटे त्याची तब्येत फारच बिघडल्याने त्याला पहाटे ४-०० वाजता उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय आधिक्षक डॉ. शंकर चव्हाण यांनी त्याच्यावर उपचार केले. ताप सर्दी ,खोकला ,श्वास घेण्यासाठी त्रास होत होते हे सर्व लक्षण त्याच्यात आढळुन आल्याने तो कोरोना संशयित असल्याचे डॉक्टरा कडुन सांगण्यात आले असुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांच्या देखरेख खाली पाठवुन देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ. माधव विभुते , डॉ. .मारोती चंदापुरे , डॉ. आशिष कदम यांनी दिली होती उमरी तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण आढळुन आल्याने तालुका प्रशासन डॉक्टर आरोग्य विभाग सर्तक झाले होते उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे तो संशयित त्याच्या सासरवाडीत थांबला होता त्या कुटुंबातील सर्व लोकांना वीस दिवसासाठी होमकोरोटाईन करण्यात आले होते ते घरा बाहेर पडु नये तसेच गावचे लोक कोणीही त्या कूटुंबाला भेटु नये असा कडक इशारा प्रशासना च्या वतीने देण्यात आला होता. त्या कोरोना संशयित रुग्णांच्या गळयातील थुंकीचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते ते आज दि३१ मार्च रोजी त्याचा  अहवाल आला आहे त्यात तो  निगेटीव्ह आला असल्याची माहीती डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे नांदेडच्या जनता आनंदी झाली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...