नांदेड पुन्हा हादरले! कोरोना रुग्णांची संख्या परत वाढली
- आतापर्यंत तिघांचा मृत्यू
नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना आज दुपारी आणखी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे. अत्ता पर्यंत 31 आणि आज 3 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही संख्या आता 34 वर पोहचली आहे. आज पर्यंत नांदेड़ मध्ये 3 कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे. आज के हे 3 ही नवे रुग्ण गरुद्वारा परिसरातील आहेत रुग्णावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृति सध्यास्थितित स्थिर आहे अशी माहिती आरोग्य विभागा कडून देण्यात आली आहे.
नांदेड़ जिल्हाचे शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसिकर यांनी आव्हान केले आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

No comments:
Post a Comment