बिलोली तालुक्यात कोरोना चा पहिला रूग्ण सापडला नागरिकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी
नांदेड:- शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणुचा फैलाव सुरू झाला असून बिलोली तालुक्यात कोरोना चा पहिला रूग्ण आढळला असून रूग्ण केरूर येथील रहिवासी आहे. अशी माहिती बिलोली चे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा तसेच बिलोली तालुका प्रशासन दिवस-रात्र प्रयत्नशील होते.तब्बल दोन महिन्यात एकही कोरोना रूग्ण बिलोली तालुक्यात सापडला नव्हता.पण दि.१७ मे रोजी तालुक्यातील केरूर येथील रहिवासी असलेला रूग्ण त्रास होत असल्याने तो नांदेड येथुन केरूर येथे न जाता थेट बिलोली येथील उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाला.त्याचे स्वँब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता.त्याचा अहवाल दि.२१ मे रोजी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आला असून त्याचेवर बिलोली शहरातील कोविड सेंटर येथे सध्या उपचार चालू असून नागरिकांनी आपल्या घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे.अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.
कोरोना विषाणूने शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही पसरत असल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगत घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे.बिलोली तालुक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment