मुंबईतुन भोकरला आले 21 जन..!त्यांना जी.प.शाळेत केले क्वारंटाईन.!
भोकर (प्रतिनिधी)
लॉकडाऊनच्या काळात मूळ गावी जाण्यास परवानगी मिळाल्याने 21 जण मुंबईतून सकाळी फुले नगर भोकर येथे दाखल झाले आहेत. ही माहिती मिळताच त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची पाहणी करून आणि आरोग्य तपासणी करून त्यांना शिक्के मारून भोकर येथील जिल्हा परिषद शाळा येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे,व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधीक्षक अशोक मुंढे, यांनी दिली. तसेच सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना भोकर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी नागरिकांना दिले आहे.
उपविभागीय अधिकारी पवन चांडक,तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार भोकर येथे योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्यात येत असून या विषाणूचा संसर्गाचा एकही रुग्ण परिसरात आढळलेला नसल्याची माहिती दिली आहे मुंबई,पुणे, परिसरातून गावात येणाऱ्यांची संख्या वाढली असून असे नागरिक मिळेल ती वाहने व सापडेल त्या मार्गाने गाव गाठत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाशी जिद्दीने लढा देत असलेल्या नागरिक व प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असल्याने सर्वच जण चिंतेत असल्याचे पाहावयास मिळत आहे या सर्व साठी ,बी.ई.ओ.भोकर मठपती, व मुख्याधिकारी प्रिंयका टोंगे,व तसेच भोकरचे तलाठी मडगूलवार,वैष्णव, आदी नी परिश्रम घेऊन आपापली जीमेदारी निभावली

No comments:
Post a Comment