Friday, May 8, 2020

भोकर तालुक्यात शाळा बंद ऑनलाइन शिक्षण चालू

भोकर तालुक्यात शाळा बंद  ऑनलाइन शिक्षण चालू




भोकर (प्रतिनिधी)
संपूर्ण देशात आणि जगात कोरोना विषाणूमुळे थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वत्र लॉकडाऊन सुरू केलेला असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा ह्या १७ मार्च पासून बंद आहेत त्यामुळे चिमुकली मुले हे शिक्षणापासून दूर जाऊ नयेत यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉक्टर दत्तात्रय मठपती यांच्या पुढाकारातून शाळा बंद ऑनलाइन शिक्षण चालू हा ऊपक्रम राबविण्यात येत आहे

भोकर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२४ शाळा असून  सद्यस्थितीत एकूण *२९०३*
.आॅनलाईन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कडक  "लाॅक डाऊन" असल्यामुळे घरी रहा-सुरक्षित रहा असा  शासनाने आदेश दिल्यामुळे शैक्षणिक  शाळा बंद होऊन कार्य ठप्प झाले आहे. तालुक्यातील. *०९केंद्रातील*  शाळांनी व *४०७* शिक्षकाने सहभागी होऊन  व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक समाविष्ट केले आहेत.दरम्यान संशोधन असे सांगते की, मुले घरी राहून अधिक चांगल्या प्रकारे तेंव्हाच शिकतात व शिक्षक,विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याशी नियमित संपर्क ठेवतात *एससीईआरटी* यांच्याकडून दररोज इयत्तानिहाय कट्टा पाठवला जात असून ते व्हाट्सअॅप ग्रुप वर टाकून "शिक्षण आले आपल्या दारी" या ऊक्तीप्रमाणे शिक्षण दिल्या जात आहे सोबतच शिक्षकांच्या कल्पनेतून विविध विषयांचा अभ्यास विद्यार्थ्याकडून करून घेण्यात येत आहे.

ज्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अशा पालक व विद्यार्थ्यांसाठी सध्या मोबाईलवर संदेश पाठवून माहिती दिली जाते. हा उपक्रम भोकर तालुक्यातील हळदा पोमनाळा, नूतन भोकर ,कन्या भोकर, भोसी बेबर,देवठाणा, सोनारी, दिवशी, अदी०९ केंद्रातील जि प  शाळांनी  व्हाट्सअप ग्रुप तयार करून शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम हाती घेतल्याने  विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पडलेला खंड ऑनलाइन अभ्यासातून दूर होत असून गुणवत्ता वाढीसयातून मोठी मदत होत आहे. या उपक्रमाला शिक्षक पालक विद्यार्थी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असून केंद्रात सर्वत्र आनंदाचे व गुणवत्तेचे वातावरण निर्माण झाले आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्ताराधिकारी आर.एल मुधोळकर,डी.डी.सुपे,एम.जी वाघमारे, आदी ०९ केंद्राचे केंद्रप्रमुख ,केंद्रीय मुख्याध्यापक,व सर्व जि.प.शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक केंद्रप्रमुख  प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...