अवैध वाळू चा ट्रक पकडला वाळु माफियांचे धाबे दणाणले
भोकर (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्याने अस्वस्थ झालेल्या वाळूमाफियांनी आता बंदिस्त ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. एक ट्रक तहसीलदारांनी गेल्या आठवड्यात पकडला होता अत्ता आणखी एक ट्रक पकडण्यात आला आहे.
दिनांक 22 मे 2020 च्या रात्री 8 ते 9 च्या दरम्यान मुगट मार्गे आलेले वाहन नारवाट जवळ अवैध रीत्या 2 ब्रास वाळू हे गौण खनिज वाहतूक करताना नायब तहसिलदार सोलंकर यांना तपासणी दरम्यान आढळून आला सदरील वाहन क्रमांक MH,26, AD, 0743, मालक केशव माधव मुतकलवाङ,रा.वासरी,ता.मुदखेड, व चालक शिवाजी रामजी वहिंदे,रा.वासरी,ता.मुदखेड, यांच्यावर दंडात्मक कार्यवाही साठी ते वाहन जप्त करून तहसीलकार्यालयात आणण्यात आले आहे सदरील कार्यवाहीसाठी पथकात मंडळ अधिकारी मातुळ सुरेश कपाटे दिवशी येथील तलाठी राजकुमार मस्के यांचा सहभाग होता
सदरील वाहन भोकरचे उपजिल्हाधिकारी पावन चांडक यांच्या आदेशाने व सूचनेनुसार करण्यात आले आहे.
वाहतुकीचा नवा "फंडा'
गेल्या आठवड्या पासून तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली. सर्वसाधारणपणे खुल्या ट्रक, ट्रॅक्टर व डंपरमधून वाळू वाहतूक केली जाते. परंतु ही वाहने खुली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्य होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आता त्यावर इलाज शोधून वाळू वाहतुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. मालवाहू बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असून, ट्रक बंदिस्त असल्याने वाळू दिसत नाही आणि इतर वाहनांपेक्षा अधिक साठा वाहून नेला जाऊ शकतो, म्हणून ही पद्धत अलीकडे सर्रास सुरू आहे.

No comments:
Post a Comment