हिंगोलीत आजपासून 'ही' दुकाने एक दिवसाआड सुरू!
BM न्युज
- इलेक्ट्रिकल, स्टेशनरी, किराणा, भाजीपाला, दूध विक्री, परवानाधारक चिकन /मटन शॉप, बेकरी व स्वीटमा
हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठेतील केवळ आठ सेवांची दुकाने एक दिवसाआड आणि सकाळी ८ ते दुपारी १ या कालावधीत सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. रुचेश जयवंशी यांनी रविवारी (दि.१०) याबाबतचे आदेश काढले आहेत.
लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी टप्प्याटप्प्याने बाजारपेठ सुरू करण्यासाठी विविध वस्तूंच्या व्यापाऱ्यांना दिवस आणि वेळ ठरवून दिल्यामुळे लोकांना गर्दी टाळता येत आहे आणि त्या त्या वस्तूच्या खरेदीसाठी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याची गरज भासत आहे. हीच पद्धत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वापरण्यास सुरूवात झाली आहे.
फक्त 'हीच' दुकाने उघडता येणार!
हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इलेक्ट्रिकल, स्टेशनरी, किराणा, भाजीपाला, दूध विक्री, परवानाधारक चिकन /मटन शॉप, बेकरी व स्वीटमार्ट संबंधीत दुकाने दि. १०, १२, १४, १६ मे २०२० व याप्रमाणे पुढे एक दिवसाआड सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहतील.
ग्राहकांची नोंद आवश्यक!
ही दुकाने सुरू करताना दुकानदारांनी त्यांना दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवणे, दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवणे, मास्क लावणे, सैनी टायझरचा वापर करणे, दुकान निर्जंतुक करणे अशा अटी व शर्तीना अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे. अन्य दुकाने मात्र तूर्तास उघडता येणार नाहीत.
बंद कालावधीत घरपोच सेवेला मुभा!
बंदच्या कालावधीमध्ये घरपोच सेवा Home Delivery Service सुध्दा देता येणार आहे. पासधारक यांच्यामार्फत किराणा, भाजीपाला, फळे व औषधी अशा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी घरपोच सेवा देण्याची मुभा आहे.
वाहन नेण्यास बंदी; पायीच जावे लागणार!
या दुकानांमध्ये सामान घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना व मालक तसेच कामगारांना मात्र पायीच यावे लागणार आहे. दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करता येणार नाही. नागरिकांची वाहने रस्त्यावर येऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार बॅरेकेटींग लावण्यात येणार आहे.
.
(अधिक माहिती साठी सोबत आदेशाची प्रत देत आहोत.)

No comments:
Post a Comment