Thursday, May 14, 2020

बाभळी बंधारा गावातील सर्व कुटुंबाला दिले एका महिन्याचे राशन भाऊक गावकऱ्यांनी मानले आभार

बाभळी बंधारा गावातील सर्व कुटुंबाला दिले एका महिन्याचे राशन भाऊक गावकऱ्यांनी मानले आभार.




धर्माबाद ( वार्ताहर)
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे, या म्हणीप्रमाणे , कोरोना  माहामारी च्या काळात लॉक डाऊन झाल्याने देशभरातील कामगार, मजूरदार  व गोरगरीब जनता हवालदिल  झाली आहे. धर्ममाबाद    तालुक्यातील दानशूर व्यक्तीने दररोज"  आपले गावकरी किचन" च्या वतीने रोज 21000 स्वादिष्ट खिचडी पाकीट घरपोच देत असल्याने गोरगरीबांना आधार मिळाला. एवढेच नाही तर काही दानशूर कार्यकर्त्यांनी अन्नधान्याची किट वाटप करूनही राज्य व केंद्र सरकारला लाखो रुपये  निधीची मदतही केली आहे. या दानशूर कार्यकर्त्यांमुळे धर्माबाद तालुकाअव्वल बनलाआहे. आज एका शेतकऱ्याच्या मुलाने आडत दुकान  चालवीत अन्नदात्या च्या रूपाने पुढे होऊन आपल्या गावातील सर्व कुटुंबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानातील राशन ची किंमत भरून एका महिन्याचे राशन मोफत वाटप  केल्याने गावकरी भाऊक झाले व आभार व्यक्त  केले आहे.
धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा येथील सर्वसाधारण शेतकरी बापूराव आनंदराव कदम हे पद्मावती ट्रेडर्स नावाची आडच दुकान चालवतात. देवदत्तत चेे भक्त असल््ययाने धार्मिक व्ररतीआहे. वर्षातून चार ते पाच वेळा  अन्नदान भंडारा करतात. यावर्षी   कोरोनामुळे   लाँकडाऊन झाल्याने बापूराव पाटील यांनी आपल्या आडत दुकानावरील सर्व हमाल, मापाडी व  महिलांना अन्नधान्याचे किट वाटप करुन आधार दिला.
येथील आपले गावकरी किचन चे प्रमुख सुबोध जी काकानी यांना एकवीस हजार रुपये देऊन सहकार्य केले.
  बापूराव पाटील हे  आपल्या गावाला कसे विसरतील? बाभळी बंधारा येथील गोरगरिबांना किट देण्याची योजना तयार केली  पण मन लागले नाही. एक दिवस दोन दिवस भंडारा अन्नदान करतोतच ना,यापेक्षा सर्वांनाच एका महिन्याचे राशन द्यावे हा विचार आला. राशन दुकानदार शिवाजी पाटील कदम यांच्याशी संपर्क करून गावातील सर्व  280  कार्डधारकांना महिन्याचे राशन देण्याचे ठरविले. 45 क्विंटल गहू, 28 क्विंटल तांदूळ, एक क्विंटल साखर असे एकूण 74 क्विंटल ची  किंमत देऊन, वडील कै. आनंदराव हौसाजी कदम पाटील यांच्या स्मरणार्थ,  लॉक डाऊन च्या काळात अन्नदान म्हणून दि. 14 मे2020 रोजी वाटप करण्यात आले आहे. ( माझी प्रसिद्धी देऊ नका असे सांगण्यात आले पण इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून ही बातमी प्रकाशित करण्यात येत आहे)

 यावेळी गावकरी भाऊक होऊन  आभार मानले.
याप्रसंगी सरपंच सौ. संगीता दिनकर राव कदम, माजी सरपंच बाबुराव कदम, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी. मिसाळे, पो.पा. शंकरराव पाटील कदम, विठ्ठल राव पाटील नरवाडे, गंगाधर पाटील, बालासाहेब पाटील, भाऊसाहेब कदम, मारुती दादाराव कदम, मोहनराव शेनपुंजे, तेजराव कदम,  पृथ्वीराज चाबुकस्वार, बाबू डाकोरे, देविदास धोत्रे, शेषराव पाटील, विठ्ठल पाटील, माधवराव मिसाळे, यांच्या उपस्थित फिजिकल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...