दिलासादायक त्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील दोघेही निघेटीव्ह एकाचा अहवाल येने बाकी
भोकर (प्रतिनिधी)
दिलासादायक बातमी आली आहे. भोकर येथील जो रुग्ण पोझिटिव्ह आढळला होता, त्याचा बाप आणि भाऊचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर ड्रायव्हर चा रिपोर्ट अजून यायचा आहे. दोन महिन्यांनंतर भोकर तालुक्यात कोरोनाचा पोझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना व त्याच्या ड्रायव्हर ला क्वारंटाईन केले होते. आता त्यातील दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व ड्रायव्हर चा रिपोर्ट येणे बाकी आहे
देशात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरली आहे.
भोकर तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांनी एकाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर भोकर प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील दोघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने थोडी चिंता कमी झाली आहे. मात्र, एकाचा अहवाल अद्याप यायचा आहे.

No comments:
Post a Comment