कोरोनाच्या संकटातही जीवमुठीत घेऊन काम करत असलेल्या पोलीसांना शिवीगाळ दोघावर गुन्हा दाखल .
भोकर (प्रतिनिधी)
कोरोनाच्या संकटातही पोलीस जीवमुठीत घेऊन काम करत जनतेचा जीव वाचावं म्हणून उन्हात काम करत आहेत त्यांना हॅन्डग्लो नाही पी पी किट नाही नाही कित्येक पोलिस या कोरोना ने मरण पावले कित्येक पोलिसांवर उपचार सुरू आहे जीव धोक्यातघालून अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना सहकार्य करायला हवे त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे मात्र, काही ठिकाणी परिस्थिती नेमकी उलटी दिसत आहे. पोलिसांवर हात उचलला जात आहे.
असाच प्रकार भोजर मध्ये घडला आहे.
दारू पिउन कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांना खालच्या भाषत शिवीगाळ करून धक्का बुकी केल्याने दोन मद्यपीविरूध शासकीय कामात आउथळा केल्याचा गुन्हा दाखल करून गजाउनाड केले आहे .
भोकरशहरात गेल्या अनेक दिवसापासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथील वाहतूक सुरळीतरहावी त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीसाकडून सदापोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात . दि .२१ रोजी जनता कर्फ्यू असतांना सायंकाळी सहा वाजता मद्यपी दिलीप गुरूप्रसाद तिवारी, गंगाधर जयराम लोणे हे दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी इश्वर बळीराम राठोड यांचे कॉलर पकडून तुमच्यामुळे आमच्या भोकरला करोना रुग्ण आला म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषत शिवीगाळ केली .करोनाच्या कालावधीत चोखपणे आपले कर्तव्य बजावनारे पोलीस यांना मदत करणे त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा करून त्यांना सहकार्य करणे गरजेचे असतांना अशा प्रकारचे अशोभनीय वर्तन या मद्यपीने केल्याने कर्तव्यावरील इश्वर बळीराम राठोड यांनी पोलीसात तक्रार दिल्यांने ३५३, ३३२, ५०४, १८८, १८६, २६९, २७०, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा मद्यपीनां तात्काळ आटक करून गजाआड करण्यात आले असून भोकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .बी. डेडवाल हे पुढील तपास करत आहेत .

No comments:
Post a Comment