Wednesday, May 13, 2020

पोस्ट खात्याचा आजारी रुग्णाला औषधी तर अपंगांला ATM आधार:

पोस्ट खात्याचा आजारी रुग्णाला औषधी तर अपंगांला ATM आधार:


नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड.दि.१३ लॉक डाउन चालू असताना सर्व रेल्वे, बससेस,हवाई मार्ग,वाहने बंद आहेत तरी भारतीय डाक विभाग जनतेची सेवा या संकटकाळी रात्रंदिवस करीत आहे.
नांदेड ईतवारा पोस्ट ऑफिस बेगलुर पोस्ट ऑफिस मधून दि.५ मे रोजी नांदेड येथील एका व्यक्तीच्या नावे औषधी पार्सल बुकिंग केले ते आज १३ मे रोजी नांदेड इतवारा पोस्ट ऑफिस विशेष डाक विभागाच्या व्हानाने ती औषधी पोहची करण्यात आली.
वेळ न करता ईतवारा पोस्ट ऑफिसचे  सब पोस्टमास्तर एम.डी. अली यांनी वेळ न घालवता पोस्टमन पांचाळ यांना बोलवून आजारी रुग्णाला त्वरित औषधी वाटप करण्यात आली.
कारण ही औषधी जवळपास च्या मेडिकल किंवा शहरात मिळणारी नव्हती.
ही औषधी अतिशय महत्वाची एकाद्याला जीवनदान देणारी होती.
ही औषधी मिळाल्याने आजारी रुंगाच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता.
ही औषधी वाटप केल्याने ग्रहांकानी डाक विभागाचे आभार मानले.
तसेच नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस जवळ एक मनाला हुरहूर लावणारी काळजाला भिडणारी एका अपंगांची व्याथा होती.
एक अपंग आपल्या दोन मुलाला उन्हात घेऊन आपल्या तीन चाकीच्या मागे अपंगांचे अनुदान घेण्यासाठी निघाला रस्त्याच्या बाजूला पोस्टमन वडजे उभा होता अपंग व्यक्तींनी पोस्टमन यांना ओळखले आणि म्हणाला साहब मेरे पैसे मिलिगे क्या मेरी मजबुरी है! मुझे पैसे मिले तो मेरे गाडीका चक्का चलेगा.दो छोटे बच्चे को खाना मीलेंगा साहब अस म्हणत होता.
पोस्टमन वडजे यांनी ताबडतोब अपंगांचे  बँकेचे खाते क्रमांक पोस्ट बँकेला जोडले आणि अपंगांला पोस्ट बँकेच्या मायक्रो ATM द्वारे  जमा झालेले अनुदान रक्कम  दोन मिनिटात काडून दिले.
अपंग व्यक्ती व दोन मुले पोस्ट विभागाचे व पोस्टमन वडजे याचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...