Friday, May 15, 2020

नांदेडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा दणक्याने वाढला बाधितांची संख्या ८४ वर



नांदेड (प्रतिनिधी)
दि. १४ मे २०२० रोजी तपासणी साठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी १८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे.
त्यापैकी  13 रुग्ण प्रवासी आहेत, 4 रुग्ण करबला भागातील आहेत व 1 रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहे

दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल शनिवार दि. 16 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यामध्ये नव्याने 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 13 जण प्रवासी, चार जण करबला नगर व एक जण सराफा भागातील रहिवासी आहे.

मागच्या दोन दिवसांपासून अहवाल प्रलंबित होते. प्रयोग शाळेत काही तांत्रिक अडचण असल्याने दि. 15 मे रोजी अहवाल येऊ शकले नव्हते. सदरचे अहवाल शनिवारी सकाळी धडकले. यात 18 जणांना कोरेानाची लागण झाल्याने नांदेडकरांना पुन्हा जोर का झटका बसला आहे.

आठरा जणांमध्ये 13 जण हे परराज्यातील असल्याचा अंदाज असून काही दिवसांपूर्वी करबला नगर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच भागातील चार जणांना कोरोनाची लागण झाली, तर सराफा भागात ही नव्याने रुग्ण आढळून आल्याने सराफा परिसरातही सकाळी-सकाळी मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षणे न  आढळून आल्याने 26 जणांना  कोविड केअर सेंटरकडून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यासाठी दिलासा बाब काही औटघटकेची ठरली, असून पुन्हा नवे आठरा रुग्ण सापडल्याने नांदेडमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 84 इतकी झाली. यात 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा यापूर्वी मृत्यू झाला, तर दोन कोरोनाग्रस्तांचा तपास अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या आता 51 वर आली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...