अवैध रेती चालवण्यासाठी मासिक हप्ता 25 हजार रुयांची मागणी करून ती स्वीकारणारा तलाठी लाचलूचपत विभागाच्या जाळयात
नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड:-लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. याला पोलिस विभाग आणि महसूल विभागाच्या छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असतानाही नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेले आहे. यामध्ये नांदेड जवळ असलेले सर्व नदी मधून अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करत आहेत.
नांदेड येथील ब्राह्मणवाडा तलाठी हे वाळूचे टिपर विनापरवाना चालू देण्यासाठी मासिक हफ्ता 25 हजार रुयांची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या ब्राह्मणवाडा सज्जाचे तलाठी माणिक बोधगिरे यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात विनापरवाना वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे येती माफियांचे मनसुबे दिवसेंदिवस वाढल्याचे पाहावयास मिळते लॉकडाऊनमध्ये सुद्धा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे.
अवैध वाहतुकीला सर्वाधिक पाठबळ असणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाड वाळूमाफियाकडून पुरविले जातात. त्याचे आजची कारवाई उत्तम उदाहरण आहे. दरम्यान तक्रार दारचे वाहन रेतीची वाहतूक करण्यासाठी चालू द्यावे यासाठी ब्राह्मणवाडा सज्जचे तलाठी माणिक बोधागिरे यांनीही मासिक 25 हजार रुपयांचा हप्ता मागितला होता

No comments:
Post a Comment