Sunday, May 3, 2020

नांदेडमध्ये शुक्रवार पासून 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अजूनही बेपत्ता

नांदेडमध्ये शुक्रवार पासून 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अजूनही बेपत्ता

नांदेड़ (प्रतिनिधि)
 नांदेड शहरात 20 पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. यातील काही 'कोरोना'बाधित रुग्ण पळाल्याच्या चर्चेने यात आणखी भर पडली आहे. शुक्रवारी दिवसभरात शोधाशोध करत पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले तर चार जण अजूनही फरार असल्याचे वृत्त आहे.

पंजाबहुन परत आलेल्या तीन चालक व एका मदतनीस यास 'कोरोना'ची बाधा झाल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका खडबडुन जागी झाली आणि श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 97 सेवादारांचे 'स्वॅब' चाचणीसाठी घेतले.

गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र ते तेथून काही वेळेतच निघून गेले आणि सगळा गोंधळ उडाला यातील 20 पैकी केवळ 16 कोरोनाबाधित व्यक्तींचेच संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती घेण्यात आली होती. तर त्यापैकी पाच व्यक्तींची आवश्यक माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे 'त्या' वीस कोरोनाबाधित सेवादार रुग्णास शोधण्यासाठी वजिराबाद पोलीस निरीक्षक संदिप शिवले व पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के यांना  चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या व नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा शोध लागत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात ठाण मांडुन बसले आहेत. तेव्हा कुठे शुक्रवारी दुपारपर्यंत अकरा जणांना शोधण्यात यश आले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच कोरोनाबाधित अशा 16 जणांचा शोध लागला बाकी 4 जण अजून गायब आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहे

यांपैकी फरार झालेल्या चार 'कोरोना'बाधितांची अपूर्ण माहिती असल्याने त्यांना शोधता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कुणीही माहिती देण्यास तयार नाही. .

नांदेड़ मध्ये 4 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण  फरार आहेत ते कुठे आहेत प्रशासनाने  त्याची माहिती पूर्ण नाही घेतली अत्ता ते नांदेड़ मध्ये कुठ कुठ फिरत आहेत कोणालाच पत्ता नाही नांदेड़ कराणो आपला जीव वाचवा बाहेर पडू नका बाहेर कोरोना के रुग्ण मोकाट फिरत आहे

16 जणांना घेतले ताब्यात
लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सेवादार म्हणून कार्यरत असलेल्या 97 लोकांची 'कोरोना' चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी काल लंगर साहिबमधील 20 सेवेकऱ्यांची तपासणी पॉझिटिव्ह आली. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केलेल्या रुग्णांचे पत्ते बरोबर न घेतल्याने बाधित चार रुग्ण अजूनही सापडले नाहीत. शनिवारी दिवसभर अहवाल हाती पडताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशावरून गुरुद्वारा परिसरात शोधमोहिम राबवून 16 जणांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवले यांनी सांगितले की, रुग्णाचे पत्ते नीट घेणे हे महापालिकेचे काम आहे, त्यांनी ते व्ययस्थित करायला हवे होते.. त्यामुळे च असे झाले…

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...