Saturday, May 2, 2020

नगीनाघाट गुरुद्वारा परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !

नगीनाघाट गुरुद्वारा परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !


नांदेड़ (प्रतिनिधि)
नगीनाघाट गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आयुक्त डॉ सुनील लहाने यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे  उपस्थित असून नगीनाघाट परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.


पंजाब वरून नांदेड मध्ये आलेल्या 20 जणांना कोरोणाची बाधा झाली आहे शनिवारी सकाळी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे नांदेडमधील कोरोना ग्रस्तांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे शनिवारी त्या सर्व रुग्णाना रुग्णालयात पाठवण्यात आले  नांदेड मध्ये आता  एकूण 26 करोणाचे रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे 24 जनावर उपचार सुरू आहे.

  नगिनाघाट गरुद्वारा परिसर सील करण्यात अला आहे या कडे जाणारे सर्व रस्ते पोलीस अधीक्षक विजयकुमार  मगर  यांनी दिलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा मोडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.
     कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश  लागू आहे त्यात साथ रोग कायदा लागू करण्यात आला आहे.  शहरातील नगिनाघाट गरुद्वारा परिसर मध्ये आज 20 रुग्ण आढळून आल्या नंतर मा. पोलीस अधीक्षक मगर यांना प्राप्त अधिकारानुसार व त्यांनी दिलेल्या  आदेशानुसार या मार्गाकडे जाणारे सर्व रस्ते कोणतीही वाहतूक करण्यास बंद करण्यात आले आहेत.
   जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर रस्त्यावर येऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.  पोलीस कर्मचारी कसल्याही संकटाची तमा न बाळगता रस्त्यावर सेवा बजावत आहेत त्या मुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...