Wednesday, May 13, 2020

मद्यप्रेमी साठी खुश खबर परवा पासून घरपोच दारु !

मद्यप्रेमीसाठी खुश खबर परवा पासून घरपोच दारु !



- सकाळी १० पासून नोंदणी  सुरू होणार
-राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांची माहिती

मुंबई दि.13 : मागील  पावणे दोन महिन्यापासून मद्यप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर घरपोच दारू मिळण्याची सुविधा शुक्रवारी (दि.१५) सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. कोविड-१९ मधील नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी शासनाने विशेष अधिकारात हा निर्णय घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी आज सरकारी माध्यमांना दिली.
परवाना असल्याशिवाय सुविधा नाही!
केवळ मद्य बाळगणे व सेवन करण्याचा परवाना असलेल्यांना व्यक्तींनाच या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याने ऑनलाईन मद्यविक्री परवाना घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर त्याचा सविस्तर तपशील देण्यात आला असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक मद्यप्रेमी आपल्या माहितीची नोंद करून आणि विहित शुल्क भरून मद्यसेवन व बाळगण्याचा परवाना मिळवू शकतात. 

कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे 2020 पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये शासनाने विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी दिला आहे. 

घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी 14 मे 2020 पासून सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार होती. परंतु डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे अशा प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस वाढविण्याची मागणी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केली गेल्यामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
 
वेळेचा कालावधी जिल्हाधिकारी ठरविणार!
ज्या जिल्हयात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्हयाच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी   मद्यविक्रीकरीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे, त्याच वेळेत घरपोच मद्यसेवा उपलब्ध असेल, असेही उमाप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...