Sunday, May 3, 2020

पत्रकार सय्यद मुसा यांचे निधन

पत्रकार सय्यद मुसा यांचे  निधन



जिंतुर प्रतिनिधी     
जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला येथील ज्येष्ठ पत्रकार सय्यद मुसा यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने वयाच्या 55 व्या वर्षी रविवार 3 मे रोजी पहाटे 2:00 वाजता राहत्या घरी निधन झाले आहे.
            ज्येष्ठ पत्रकार सय्यद मुसा यांनी मागील 15 ते 20 वर्षात वृत्तपत्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. पण हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा दफनविधी शहरातील फुकरा मोहल्ला कब्रिस्तान येथे रविवार 3 मे रोजी सकाळी 7 वाजता करण्यात आल. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...