Sunday, May 3, 2020

जिंतूरात लाॅक डाऊन दरम्यान तांबखूचा ट्रक पोलिसांनी पकडला

जिंतूरात लाॅक डाऊन दरम्यान तांबखूचा ट्रक पोलिसांनी पकडला




टेम्पो चालका वर गुन्हा दाखल


जिंतूर प्रतिनिधी,
सध्या कोरोना सावटात हाताला काम नसल्याने लोकांची उपासमार होत आहे. राज्य सरकारने उद्या पासून ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात दारू आणि पानटपरी सुरू करण्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर गुटखा माफियांनी पूर्व तयारी म्हणून  चाळीसगांव येथून आयशर टेंपोने विक्रीसाठी आणलेल्या तीन लाख पंचेचाळीस हजार किंमतीची सूर्यछाप जर्दा नावाची दिडशे पेटी तंबाखु आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जिंतुर तालुक्यातील आडगाव फाटा चेकपोस्ट वर जप्त केली आहे.
राज्यात लागू असणाऱ्या संचारबंदी आणि मान.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या तंबाखु मालाची वाहतूक करणे आणि कोरोना संसर्गाचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्याचे सपोनि शेख अहमद यांच्या तक्रारीनुसार आयशर टेंपो क्र.MH-१९ Z- ५९०० चालक आरोपी शेख शकुर शेख कासम वय (५२) रा. झोपडपट्टी, चाळीसगाव जि. जळगाव यास ताब्यात घेतले असून त्याचे विरुद्ध गु.र.नं. १९२/२०२० कलम १८८,२६९,२७० सहकलम २७१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१(ब) नुसार जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...