Wednesday, May 6, 2020

हिमायतनगर च्या गुटखा किंगचा 46 लाखाचा माल नांदेड़ स्थानिक गुन्हे शाखेने पकड़ले

हिमायतनगर च्या गुटखा किंगचा 46 लाखाचा माल नांदेड़  स्थानिक गुन्हे शाखेने पकड़ले



नांदेड़ (प्रतिनिधि)
नांदेड़ येथील वसरणी भागात असलेल्या दुध डेअरी चौकातून जाणाऱ्या एका कांदयाच्या वाहनामध्ये तब्बल 46 लाखाचा शासनाने बंदी घातलेला गुटखा चोरी-छुप्या पद्धतीने नेला जात असल्याची घटना दि.06 रोजी उघडकीला आली असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हि कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. हिमायतनगर  मध्ये एक गुटखा किंग आहे तो संपूर्ण नांदेड़ जिल्ह्यात गुटखा पार्सल करतो अशी चर्चा दबक्या अवाजात नांदेड़ जिल्ह्यात सुरु आहे  काही दिवसा अगोदर हिमायतनगर येथील गुटखा माफियांचे वाहन मुलासह मुखेड पोलिसानी पकडून कार्यवाही केली होती. यानंतर पुन्हा हिमायतनगर मधील गुटखा नांदेड पोलिसांनी पकडल्याने हिमायतनगर शहर हे गुटख्याचा माहेर घर झाल्याची चर्चा सर्वातर सुरु आहे.


सध्या कोरोना पार्श्वभूमीवर बंदी असल्याने वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे गुटखा माफियाने शक्कल लढवून नांदेड शहरातून कांदा व मुरमुरा व बेक़रीचा सामान सप्लाय केला जात असल्याचे दाखवून गुटखा तस्करी केली जात आहे. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार वसरनी भागातील दुध डेअरी परिसरातून जात असलेल्या गाडी क्रमांक (एम.एच.-26-बी.ई.4064) या गाडीला थांबवून तपासणी केली असता. यामध्ये 40 बैग सागर पानमसाला, एस.आर.तंबाखू 10 पोते असा एकूण 34 लाख व 12 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन एकूण 46 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या ट्रकचा चालक हिमायतनगर येथील असल्याचे सांगण्यात येत असून, सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या पथकाने केली. त्यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे चालकाच्या खळबळ उडाली आहे व तसेच हिमायतनगर मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याची कसुन चौकशी करायला हवी अशी चर्चा सुजान जनते मध्ये आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...