Monday, May 11, 2020

भोकर येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

भोकर येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
---------------------------



भोकर (एजास कुरेशी)
भोकर-  जिल्ह्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनावर मात करण्यासाठी त्यासाठी रक्ताची आवश्यकता पाहता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर येथे दि १४ मे गुरुवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात रक्त दात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असुन विविध आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याचे दिसुन येत असुन आत्यावश्यक असलेला रक्तपुरवठ्यातही तुटवडा जानवत आहे कोरोना सह अदी आजारांसी आपण लढत आहोत आणि लढणार आहोत त्यासाठी रक्तदान व्हावे या अनुषंगाने स्वर्गीय डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय महाविदयाल तथा रुग्णालय रक्त पेढी रक्त संकलनासाठी टीम येत असून दिनांक १४ मे २०२० गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर तहसिल कार्यालयाच्या तळमजला या ठिकाणी करण्याचे योजिले आहे. सदरिल शिबीराचे उद्घाटक म्हणुन भोकर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश  मुजीब एस. शेख तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भरत सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैधकिय अधिक्षक डॉ. आशोक मुंढे, पोलिस उपनिरिक्षक अनिल कांबळे आदिंची उपस्थिती राहणार असुन रक्तदान हे जिवनदान आहे म्हणुन सदरिल शिबिरात बहुसंख्येने रक्तदान करून देशसेवेसाठी पूढे येवून  हातभार लावावा असे आवाहन  उपरोक्त मान्यवरांसह भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने केले आहे. तरी रक्तदात्यांनी नांव नोंदणी करीता शिबीरांच्या आयोजकांशि संपर्क साधावा .पत्रकार उत्तम बाबळे मो.9689360070,सिद्धार्थ जाधव मो. 9689209289,  गंगाधर पडवळे मो. 8888323257,बालाजी नार्लेवाड-7588581704,आर. के. कदम मो.9922687157,संदेश कांबळे मो.7385760301,सुधांशू  कांबळे मो 9049583358,शेख लतीफ मो.9860186756,  स्वरूपा भोसले (चौरे )मो.7796872022.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...