Saturday, May 9, 2020

धक्कादायक : नांदेड शहर पाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा रुग्ण..!आकडा ४४ वर

धक्कादायक : नांदेड शहर पाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा रुग्ण..!आकडा ४४ वर




नांदेड (प्रतिनिधी)
नांदेडला सकाळी दोन रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे.

नांदेडला सायंकाळी आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये एक रुग्ण हा माहुरचा  असून ६४ वर्षाने वयस्कर आहे व तसेच नांदेड च्या  रहमतनगर चे तिघे जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत शनिवारी सहा रुग्णांची भर पडली आहे बाधितांमध्ये दोन १४ वर्षांची मुले आहेत 

नांदेडला सकाळी दोन रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे. शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची वाढत चालली असून माहुरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला, तो बाहेरुन आला होता का किंवा अगोदरच्या कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीयातील तो व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित केले जात आहे.
तसेच नांदेड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये खूप लोक मोकाट फिरत आहेत बिनकामी बाहेर निघू नका कोरोणाला टाळण्यासाठी आपल्याला घरातच राहावे लागेल म्हणून घरातच रहा सुरक्षित रहा कोणत्याही अफवाहवर विश्वास ठेवू नका व तसेच कोणती अफवा पसरवू नका अफवा पसरवल्यास अफवा पसरवणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल येईल असे अवाहन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी केले आहे 

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...