भोकर येथे 14 मे ला रक्तदान शिबिराची यशस्वी रीत्या संपन्न
ताळेबंदीच्या काळातही 100 दानशुरांनी केले रक्तदान.....
भोकर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कोरोना महामरीचा प्रादुर्भाव लक्षात, कोरोनवर मात करण्यासाठी आणि ह्या रोगाला तोंड देणाऱ्या रुग्णांसाठी आज घडीला रक्ताची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे .हे लक्षात घेता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर येथे दि 14 मे 2020 रोज गुरुवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात दानशूर व्यक्तीनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन देशातील कोरोना तसेच इतर रोगाचा सामना करणाऱ्या रूग्णाच्या जीवाला जीवदान देण्यासाठी एक पाऊल पुढे येवून , धगधगत्या उणाची तमा न बाळगता अत्यंत परिस्थिती गांभीर्य लक्षात घेवून भोकर येथील 100 पेक्षा जास्त रक्त दात्यांनी आज स्वखुशीने रक्त दान केले आहे आणि समाजकार्य तसेच देशकार्याला हातभार लावून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून कोरोनो महामारीचे संकट सर्वत्र पसरलेले असुन यामुळे विविध आजाराच्यां रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे . यात विशेषतः कोरोना रुग्ण,गरोदर माता , वार्धक्य ग्रस्त व्यक्ती, लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण, थायलेसिमिया, आणि इतर अनेक आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याचे दिसुन येत असुन आत्यावश्यक असलेला रक्तपुरवठ्यातही तुटवडा जानवत आहे.
कोरोना सहअदी आजारांसी आपण लढत आहोत त्यामुळे त्यासाठी रक्तसंकलनाची नितांत गरज असल्याकारणाने दि. १४ मे 2020 रोजी सकाळी ९ :०० वाजता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर येथील तहसिल कार्यालयाच्या तळमजला या ठिकाणी करण्याचे योजिले होते. त्या अनुषंगाने भोकर येथील ठराविक ठिकाणी सामाजिक आंतर ठेवून तसेच शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून उत्तम प्रकारे रक्तदान संकलन करण्यात आले आहे.
यामध्ये 100 पेक्षा ही जास्त रक्त दानशुरानी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी पार पाडण्यास मदत केली आहे.
या शिबीरासाठी नांदेड येथील स्व.कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालय,व रुग्णालय रक्तपेढी नांदेड ह्यांना रक्त संकलन करून 100 पेक्षा जास्त रक्त पिशव्या रक्त देण्यात आले आहे.
सदरिल शिबीराचे उद्घाटक म्हणुन भोकर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायधिश मुजीब एस. शेख तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भरत सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैधकिय अधिक्षक डॉ. आशोक मुंडे, पोलिस उपनिरिक्षक अनिल कांबळे आदिंची उपस्थिती लाभली असून ह्यामध्ये भोकर येथील वरिष्ट न्यायाधीश , दिवाणी स्थर मा.मंदार पांडे ह्यांनी स्वतः स्वखुशीने पुढाकार घेऊन आज रक्तदान करून सर्वांना रक्तदान करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे यावेळी पी.एस.आय. अनिल कांबळे, संतोष पांडे, न्यायालयातील कर्मचारी वर्ग तसेच आयोजित कार्यक्रमाचे भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे सन्मा. सचीव सिद्धार्थ जाधव यांनी रक्तदान करून रक्तदान हे जिवनदान आहे आणि लोकांच्या जीवाला जीवनदान देण्यासाठी प्रत्येक माणसाने रक्तदान रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्यवान कार्य करण्यासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन वरील रक्तदात्यांनी यावेळी जनतेला केलेले आहे.
त्या दात्यांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सहकार्य केले.त्या सर्व सन्माननियांचे ऋण व्यक्त करण्यात आले असून या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, सचिव सिद्धार्थ जाधव,गंगाधर पडवळे,शेख़ एजाज़ कुरेशी,संदेश कांबळे,राहूल कदम,बालाजी नार्लेवाड,स्वरुपा भोसले (चौरे), विलास हटकर,सुधांशू कांबळे, शेख लतिफ, फहीम शेख ,शारुख शेख,यांसह आदींनी परिश्रम घेतले
तसेच सदरिल शिबिरात बहुसंख्येने रक्तदान करून देशसेवेस हातभार लावलेल्या सर्व रक्तदात्यांचे तसेच आयोजित कार्यक्रमास पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे शब्द सुमनांनी मनस्वी आभार भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

No comments:
Post a Comment