Tuesday, May 12, 2020

नांदेड:-आजचे १० पॉझिटिव्ह कोण? त्या मध्ये नांदेड शहर निवासी: ६

नांदेड:-आजचे १० पॉझिटिव्ह कोण? त्या मध्ये
नांदेड शहर निवासी: ६



नांदेड (प्रतिनिधी)
मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १० जणांमध्ये पाच महिला, तीन पुरुष, एक २५ वर्षीय तरुण व एक सात वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात सोमवारपर्यंत कोरोनाचे ५२ रुग्ण आढळून आले होते़ त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी त्यामध्ये नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारातील दहा तर बारडच्या एका रुग्णाची भर पडली असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६३  झाली आहे़ दहा रुग्ण लंगर साहिब गुरुद्वारातील आहेत तर एक रुग्ण हा बारड येथील असून तो  तरुण आणि काही महिला मुंबई येथून पायी चालत आले होते़ बारड येथे आल्यानंतर या तरुणासह इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ या तरुणाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला़ नांदेडची रुग्णसंख्या आता ६३ एवढी झाली आहे़

दरम्यान नांदेडमध्ये पंजाबहून परत आलेला एक वाहनचालक कोरोनामुक्त झाला आहे. २६ एप्रिल रोजी तो कोरोना पॉझीटीव्ह आढळला होता. उपचारानंतर त्याच्या दोन स्वॅब घेण्यात आले. ते निगेटीव्ह आल्यानंतर  मंगळवारी रात्री विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले.

आज चे बाधित व्यक्ती हे
फरिदाबाद, हरियाणा : २
दिल्ली व पंजाब : प्रत्येकी १
नांदेड शहर निवासी: ६ आहेत.

बाधित पुरुषांचे वय ५५, ६० व ६३ आहेत.
तर महिलांचे वय ५५, ६५, ६९, ४८ व ३५ असे आहेत.

या सर्वांवर नगिनाघाट परिसरातील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

११ पैकी १० अहवाल पॉझिटिव्ह!
मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या १५ पैकी १० पॉझिटिव्ह, ४ अनिर्णित व केवळ १ अहवाल निगेटिव्ह आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या आता ६३ वर गेली आहे. यातील ५ जणांचा पूर्वीच्या गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असून दोन जण फरार आहेत.

मयत ५ व फरार दोन वगळता उर्वरित ४६ मध्ये ३४ जण हे नगिनाघाट परिसरातील कर्मचारी, नागरिक व यात्रेकरू आहेत. शिल्लक दहा जणांमध्ये
अबचलनगर- ४, रहेमतनगर : ३,
चालक अंबानगर, सांगवी: १
किवला: १, कंधार: १ असे १० व एकूण ४४ जण नांदेड येथील रहिवासी आहेत.  माहूर व बारडचा प्रत्येकी एक रूग्ण आहे.

1 comment:

  1. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...