Sunday, May 10, 2020

Breaking..! नांदेड सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह अजून 37 अहवाल प्रलंबित,

Breaking..! नांदेड सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह  अजून 37 अहवाल प्रलंबित,




आतापर्यंत 51 रुग्ण पॉझिटिव्ह
44 पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर, आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू


नांदेड, (प्रतिनिधी) दि. 10 :- कोरोना विषाणु संदर्भात रविवार 10 मे 2020 रोजी प्राप्त तपासणी अहवालात 6 नवीन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून हे सर्व रुग्ण इतर राज्यातील, जिल्ह्यातील आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील 3 महिला, पंजाब राज्यातील 1 महिला व एक पुरुष, ठाणे जिल्ह्यातील 1 पुरुष असे एकुण 6 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत घेतलेल्या 51 रुग्णांच्या स्वॅब तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना विषाणु संदर्भात रविवार 10 मे 2020 रोजी सायं. 4 वा. पर्यंतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 96 हजार 147 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यातील 1 हजार 690 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 1 हजार 571 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 37 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. यात घेतलेल्या 51 रुग्णांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
            या पॉझिटिव्ह 51 रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व 32 रुग्ण पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले हे रुग्ण रक्कतदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...