Tuesday, May 12, 2020

चिंता वाढली नांदेडच्या या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव 22 वर्षीय तरुण कोरोनाबाधित

चिंता वाढली नांदेडच्या या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव 22 वर्षीय तरुण कोरोनाबाधित




- मुंबई या हॉटस्पॉट क्षेत्रातून आला होता


नांदेड (प्रतिनिधी)
: देशात कोरोनाव्हायरस वाढत आहे. भारतातील कोरोनामध्ये 67 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर आतापर्यंत 2200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना राज्यात सर्वाधिक पीडित राज्यात संक्रमित लोकांची संख्या 23 हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1230 नवीन रुग्ण आढळले आणि या काळात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह महाराष्ट्रात संक्रमित होण्याची एकूण संख्या 23,401 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात आतापर्यंत 868 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता मुदखेड तालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या नांदेड भोकर रोड वर असलेल्या बारड मध्ये कोरोना संसर्ग प्रवेश केला आहे. मुदखेड तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बारड येथे आढळल्याने कोरोना बाधित रुग्णाची संख्या 53 झाली आहे

मुंबई येथून बारडला परतलेल्या एका कुटुंबातील २२ वर्षाच्या तरुणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.हे कुटुंब बारडकडे येण्यासाठी मुंबईहुन पायी निघाले होते.त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता.मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्व जण दोन दिवसांपूर्वी बारडला पोहचले होते.यानंतर त्यांना
क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यामध्ये एक जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या बारडमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान मुंबई येथून निघताना यांची कुठेही तपासणी झाली नाही असेच दिसून येते.हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते.
 त्या मुळे अत्ता ग्रामीण भागातील लोकांना सावधान होण्याची गरज आहे.

औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले हे रुग्ण रक्कतदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...