पत्रकाराविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या कंदकुर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
धर्माबाद (प्रतिनिधी) शहरातील गंगासिटी नगर मध्ये आरक्षित जागेवर अनाधिकृतरित्या भव्य मंगल कार्यालयाचे बांधकाम करणारे देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी सोशल मीडियावर पत्रकाराविषयी अपशब्द वापरल्यामुळे कंदकुर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील पत्रकार बांधवांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील गंगासिटी नगर मध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनानी सदरील जागा आरक्षित केली होती.परंतु देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी धनशक्तीच्या जोरावर भव्य अनाधिकृतरित्या मंगल कार्यालयाचे बांधकाम केले आहे.सदरील अनाधिकृत मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यासाठी येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता.परंतु सदरील ठराव पारीत होऊन सहा महिने उलटले आहे.परंतु मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे नगरपरीषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उलट सुलट चर्चा सुरू आहे.सदरील प्ररकरणाचे वृत्त अनेक पत्रकार बांधवांनी प्रकाशित केल्या होत्या.व गंगासिटी नगर मध्ये जुगार सुरू असल्याचे नागरीकांनी पत्रकारांना सांगितल्यानंतर काही वृत्तमान प्रत्रात सदरील जुगाराविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे पित्त खवळलेल्या देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी शनिवारी व्हाॅटसाफ गुरूपवरील झेड प्लस गुरुप मध्ये पत्रकाराविषयी अपशब्द तेही घाणेरड्या भाषेत मजकूर टाकल्यामुळे पत्रकार बांधवात संतापाची लाट उसळली होती.सदरील घटनेचा निषेध पत्रकार संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,व्यापारी व नागरीकांनी केला आहे.देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी येथील पत्रकार बांधवांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.यावेळी बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते, सुरेश घाळे, कृष्णा तिम्मापुरे,अंनतोजी कालीदास, गंगाधर धडेकर, बालाजी बकवाड, संपादक मनोज बुंदेले, सुमेध बनसोडे,सुदर्शन वाघमारे, राजेश मनुरे,सतिष शिंदे,मारोती झंपलवाड, गजानन चंदापुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना पत्रकारांचा शिष्टमंडळ भेटणार असल्याचे बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment