Sunday, May 3, 2020

वेंकटेश्वरा कॉटन मिलचा तो व्यक्ति पंजाब ला जाऊंन कोरोना पॉजिटीव्ह आला घबरदारी म्हणून 71 जणाला होमकोरोंटाइन भोकर कराणो घाबरू नका.

वेंकटेश्वरा कॉटन मिलचा तो व्यक्ति पंजाब ला जाऊंन कोरोना पॉजिटीव्ह आला घबरदारी म्हणून 71 जणाला होमकोरोंटाइन भोकर कराणो घाबरू नका.


                            फाइल फोटो


भोकर (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यातील सर्व नागरीकांना नम्र सुचना आहे.भोकर तालुक्यामध्ये आणखी कोरोना बाधीत व्यक्ती नाही खोट्या अफवा पसरु नका? तो कायद्याने गुन्हा आहे.घरात राहुन प्रशाशनाला सहकार्य करा?नांदेडमध्ये जे पाॅझेटिव्ह लोक आहेत त्यांचा उपचार सुरु आहे.पोमनाळा काॅटन मिलमधील पाॅझेटिव्ह हा पंजाब मधील असुन,त्या काॅटन मिल मध्ये काम करनार्या सर्व लोंकाना ख़बरदारी म्हणून होम काॅंरनटाईन केले आहे सुरक्षेचा उपाय म्हणून!कोरोना हा ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे.त्यांचीच तब्येत बिघडते तरी सर्वजन सावध रहा सविस्तर असे की येथून जवळच असलेल्या भोकर-निर्मल महामार्गावरील मौजे पोमनाळा स्थित व्यंकटेश्वरा कॉटन मिल मधील ग्रेडर पदावर काम करणाऱ्या एकाला पंजाब मध्ये गेल्या नंतर कोरोना  अहवाल पॉझिटिव्ह  आल्याची बातमी कळताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'या' मिल मधील सुमारे ७१ जणांना आरोग्य विभागाकडून,आज(दि०३) दुपारनंतर  होम क्वारंटाईन करण्यात आल्याची अधिकृत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.राहुल वाघमारे यांनी  दिली आहे .
मूळचा पंजाब प्रांतातील रहिवासी असलेला एक व्यक्ति प्रस्तुत जिनिंग मिल मध्ये मागील तीन वर्षापासून ग्रेडर या पदावर कार्यरत होता. कोरोना या संसर्गजन्य अजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले नंतर कॉटन मील बंद असल्या कारणाने दिनांक २६ एप्रिल रोजी गुरुद्वा-यात  अडकलेल्या पंजाबमधील "त्या" भाविक यात्रेकरू सोबत तो  गावाकडे परतला होता .  पंजाब येथे पोहोचल्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी अंती तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याचे मिलच्या व्यवस्थापनास समजताच त्यांचेकडून  तालुका प्रशासनास  कळविण्यात आले. यावरून उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली  तात्काळ तालुका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या हेतूने तालुका आरोग्य विभागाच्या मदतीतून या जिनिंग मध्ये काम करणाऱ्या परिसरातील सुमारे ७१ कामगारांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान  या ग्रेडरला नेमकी  कोठे कोरोनाची लागन झाली हे मात्र स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले.  सध्या भोकर तालुका या घटनेमूळे दहशतीखाली आला आहे.
या घटनेमुळे भोकर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा आणि शासनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भोकर मधे कोणीही  बांधीत नाही  अफवांवर विश्वास आजिबात ठेऊ नका शासन-प्रशासन सहकार्य करा घरी राहा सुरक्षित राहा

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...