Thursday, January 2, 2020

भोकर तालुक्यातील ५०३ शिक्षकांना ' निष्ठा' प्रशिक्षण






भोकर तालुक्यातील ५०३ शिक्षकांना ' निष्ठा' प्रशिक्षण




. भोकर (एजास कुरेशी)- तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे गुणवत्तेत वाढ व्हावी या करिता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  पहिली ते आठवी इयत्तेसाठी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ऍडव्हान्समेंन्ट(निष्ठा) या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे.


 केंद्र सरकारकडून २२ ऑगस्ट २०१९ रोजी निष्ठा प्रशिक्षण या कार्यक्रमाची विधीवत घोषणा करण्यात आली. यानंतर प्रत्येक राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.याचाच भाग म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, गट साधन केंद्रात दिनांक १८ डिसेंबर पासून राज्य साधन व्यक्ती तथा डायटचे जेष्ठअधिव्याख्याता श्री एस.वाय.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशिक्षण  कार्यक्रम सुरू आहे.

या प्रशिक्षणात अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रिया, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन,, पुढाकार नेतृत्वाचा परिपूर्ण विकास, अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये कलात्मकरीत्या सर्व विषयांचा अंतर्भाव करणे, आदीसह सर्व विषयाच्या अध्यापन शास्त्राविषयी सखोल माहिती, सिम्बॉयसिस पुणे येथे भाषा, गणित,सामाजिक शास्त्र या विषयात राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेले  साधन व्यक्ती प्रमोद पाटील, अशोक कोळगावकर, संतोष रत्नपारखी, आर.एस. झाडे,संजय खांडरे आदीकडून दिले जात आहे.

सदरचे प्रशिक्षण हे चार टप्प्यामध्ये ५०३ शिक्षकांना दिले जात असून पहिल्या टप्प्यातील १२५ शिक्षकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहेत.सध्या दुसरा टप्पा सुरू असून डायटचे प्राचार्य जयश्री आठवले, गट शिक्षणाधिकारी डॉ.डी.एस मठपती, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्ताराधिकारी आर.एल. मुधोळकर,एम.जी.वाघमारे ,डी.डी.सुपे,तसेच केंद्रप्रमुख विजय महाजन,लक्ष्मण सुरकार, अनिल सिरसाठ ,विषयतज्ञ जगदीश थडवे ,राधेश्याम चौधरी आदी  प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत..

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...