Friday, January 17, 2020

भोकर अवैध वाहतूकीचे थांबे करून रस्त्याची कोंडी केल्या मुळे वृद्धाचा मृत्यु

भोकर अवैध वाहतूकीचे थांबे करून रस्त्याची कोंडी केल्या मुळे वृद्धाचा मृत्यु




घटनेबाबत कळालेली माहिती अशी की, दिनांक 16 जानेवारी रोजी भोकरचा आठवडी बाजार असल्याने भोकरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठी गर्दी झाली होती, त्यातल्या त्यात अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हलस,मागझिमो, ऑटो ,व तसेच मोटारसायकल,  ट्रॅफिक पोलिसांच्या समोर रस्त्यातच उभी करतात या गर्दीतून किनवट कडून नांदेड कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच. 26 एडी 14 77 चा चालक निष्काळजीपणाने आपले वाहन चालवून, हाजी मिर्झा वाहेद बेग रहीम बेग वय 80 वर्षे राहणार सहिद नगर भोकर, यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.



अपघातस्थळी जमलेली गर्दी चौकात अपघात होताच शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन वृद्धास वाचवण्याचा प्रयत्न केला पण, ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला होता, गर्दीचा फायदा घेऊन ट्रक चालक घटनास्थळावर ट्रक सोडून  पळून जाण्यात यशस्वी झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले,पो.हे.उमेश कारमुंगे अशोक सिंगनवाड,संजय अरकीलवाड, यांनी तात्काळ  घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती  नियंत्रणात आणली अपघाताचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
 गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या संघटना व सामाजिक कार्यकर्तेने अनेक तक्रारी देऊन सुद्धा या बाबत संबंधित विभागाने दखल न घेता प्रवाशी वाहतुकिस पाठबळ दिले सदरील रस्त्यावरुन हजारों विद्यार्थी ची दररोज ये जा असते आशा प्रकारचा अनर्थ पुन्हा होऊ नये म्हणून सदरील आंबेडकर चौकात अवैध वाहतुकीची थांबे तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष राजेश चंद्रकर (चंद्रे) यांनी दिला आहे


No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...