Thursday, January 2, 2020

मुलाचा राग काढला बापावर शेख सलिमवर जिव घेना हल्ला

मुलाचा राग काढला बापावर शेख सलिमवर जिव घेना हल्ला


गाव गुंडाकडून केलेल्या मारहाणीत
अजणीचा शेख गंभीर जखमी

बिलोली(तालुका प्र.)दि.०१ जानेवारी
तालुक्यातील अजणी येथील शेख सलिम शेख अहेमद वय ४५ वर्ष हा गावातुन एका दुचाकी वरुन जात असतांना याच गावातील सहा व्यक्तीनी चार महिण्या पूर्वि शेख सलिम यांच्या मुला सोबत झालेला वाद मनी धरुन रागाच्या भरात शेख सलिमवर जिव घेना हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.या प्रकरणी बिलोली पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या सहा पैकी संभाजी नागनाथ हंडे वय २५ वर्ष या आरोपीला अटक करण्यात आले असून अन्य पाच आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
चार महिण्या पूर्वी शेख सलिम याच्या मुलाचा वाद प्रेम प्रकरणातून या गावातील कांही व्यक्ती सोबत झाला होता पण आप-आपसात तडजोड करुन वाद मिटून घेण्यात आला.या नंतर शेख यांचे कुटुंब तेलंगना राज्यात राहत होते.कांही कालावधी नंतर हा गावाकडे येऊन दुचाकीवर बिलोलीकडे  येत असतांना दि.३१ डिसेंबर रोजी दोन ते तीन व्यक्तीनी दुचाकी अडवून शेखला खाली उतरवण्यात येऊन दमदाटी करीत दुसऱ्या दुचाकी मोटार सायकलवर बसवण्यात आले.या नंतर एका शेतात घेऊन जाऊन त्या ठिकाणी दोरीने हातपाय बांधुन कोणी तोंडावर थापडबुक्या देत तर कोणी काठीने मारहान करीत गंभीर जखमी केले आहे.ही घटना समजताच बिलोलीचे सामाजिक कार्यकर्त पत्रकार वलियोद्दिन फारुखी यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवून तात्काळ जखमीला रुग्नालयात दाखल करण्यात मदत केले.तर दुसारीकडे या बिटचे जमादार शिंदे हे अजणीकडे येत असल्याचे आरोपीला समजताच
याच दुचाकीवर शेख यास त्याच्या घरी जखमी अवस्थेत सोडण्यात आहे.प्रकृती गंभीर असल्यामुळे प्रार्थमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक केंन्द्रे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...