Thursday, January 16, 2020

नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी; भोकरमध्ये१८ जानेवारी रोजी मोर्चा व धरणे आंदोलन

नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी;
भोकरमध्ये१८ जानेवारी रोजी मोर्चा व धरणे आंदोलन




भोकर (प्रतिनिधी) भारतीय संविधान समता स्वातंत्र्य सर्वधर्म स्मभावा लोकशाहीवर अधारित असतांना केंद्र सरकारने नागरिकत्व नोंदणी सीएए कायदा लागू करून देशात अराजकता माजवीत आहे.हा कायदा रध्द करावा. या मागणीसाठी शनिवार दि,१८जानेवारी रोजी सकाळी ११वाजता मोर्चा व धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. या धरणे आंदोलना ला कुल जमाती तहेरीक संघटना
भोकर यांचा जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
आपल्याच देशातील नागरींकांना जाचक अटी लावुन नागरिकत्व  सिद्ध करायची काय गरज आहे.   ज्यांच्यासाठी हजारो वर्षापासून शिक्षणाची दारे बंद होती दर्याखोर्यात रहाणारे मागास आदिवासी बहुजन भटके विमुक्त नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारला हवी ती कागद पत्रे कुठून आणायची ? मोदी शहा अनेक जाचक कायदे करून देशातील नागरिकांना वेठीस धरत आहेत.केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व कायदा त्वरित रद्द करावा.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करावी.आज के शिवाजी नरेंद्र मोदी या शिवाजी महाराजाचा आवमान करणाऱ्या पुस्तकावर कायमची बंदी घालावी.लेखक भगवान गोयल यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदी मागणीसाठी मोर्चा व धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहेत.

आंदोलनाला मार्गदर्शन व सहभागी होण्यासाठी डॉ.यशपाल भिंगे,प्रा.रामचंद्र भरांडे,अँड.शिवाजी कदम,मोहन राठोड,फारूख अहैमद,सयद मोईन,नामदेव आयलवाड,जगदिश पाटील,गोविंद गौड,सुभाष पा.किन्हाळकर,नागोराव शेंडगे,बी.आर.वाकोडे, आदीसह विविध संघटनाचे कार्येकर्ते सहभागी होणार आहेत आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान नागरिकत्व कायदा विरोधी कृती समिती मोर्चाचे आयोजक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  एल.ए.हिरे,बाबुराव राठोड,मिलिंद गायकवाड,करीम करखेलीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...