Thursday, January 23, 2020

भोकर शहरात पिसाटलेल्या वानरांचा हौदोस

भोकर शहरात पिसाटलेल्या वानरांचा हौदोस

                                                            फाईल  फोटो

माणसानंतर जर कोणता प्राणी हुशार असेल तर तो म्हणजे वानर. एक वानर असूनही तो अनेक गोष्टी शिताफीने करत असतो. मात्र कधी-कधी त्यांच्या वानरचाळ्यांमुळे अनेकांना नुकनही सहन करावं लागतं. डोंगरकडांवर आढळून येणारी ही वानर ज्यावेळी मानववस्तीमध्ये येतात त्यावेळी त्यांचा हौदोस पाहण्यासारखा असतो. एकतर मानववस्तीत आल्यामुळे येथील लोक मारतील ही भीती त्यांच्या मनात असते, तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं.

भोकर शहरातील भीम टेकडी  परिसर व बसस्टँड रोडवर असलेल्या नसीब बोरवेल वर गुरुवारी एका पिसाळलेल्या वानरांने उच्छाद माजवला होता रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढविला होता त्यांचा चावा घेण्याचा प्रयत्न करत होता व तसेच बोरवेल मधील काच तोडण्याचा प्रयत्न करत होता या वानरांच्या उच्छादामुळे  परिसरात बघायची गर्दी जमली होती पण त्याला हाकलून लावण्याची कोणाचीही हिंम्मत होत नव्हती पिसाट असल्या मुळे परिसरातील नागरिंकामध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे बसस्टँड रोड व भीम टेकडी या भागात पिसाटलेल्या वानरांनी नागरिकांना लक्ष करून या पिसाटलेल्या वानंराने तळ ठोकून बसला आहे.
त्यामुळे नागरिकांचे घरा बाहेर पडने कठीण झाले आहे घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्या ना देण्यात आली असून वन विभाग काय कार्यवाही करेल या कडे जनतेचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...