Saturday, March 2, 2019

youtube चॅनेल व पत्रकारितेचे कार्ड दाखवून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिस कोठडी तर दोन फरार


youtube चॅनेल व  पत्रकारितेचे कार्ड दाखवून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिस कोठडी तर दोन फरार



बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भोकरदन तालुक्यातील youtube चॅनेल व  पत्रकारितेचे कार्ड दाखवून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिस कोठडी.या टोळीतील मोरक्या विश्वास ढसाळ व त्याचा साथीदार प्रल्हाद बोरसे यास पारध पोलीसानी ताब्यात घेतले तर दोन सहकारी फारर आहेत.त्याच्या टोळीने अशे कितीतरी प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे.त्याच्या वर भा.द.वि.188,384,385,341,394,506,34 अंतर्गत गुन्हे दाखल असून सोबत मोठी यंत्रणा असण्याची शक्यता आहे.मा.न्यायालयाने त्यांना पी सी आर मंजूर केला आहे.पत्रकारिचे कुठलेही शिक्षण नसतांना त्याला विभागीय कार्ड देणारे चॅनल व आणखी लोकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. पुढील तपास पारध पोलीस करत आहे.
      भोकरदन,जाफराबाद,जालना,बीड परिसरातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,शासकीय, निमशासकीय कार्यालय ,महसूल विभाग, शाळा -महाविद्यालाय संस्थाचालक,बँका अश्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा गोरख धंदा या टोळीचा आहे. यानी विभागात अक्षरश: हवदोष घालून दहशद निर्माण केली होती. ही टोळी जर एखाद्या वेक्तीने त्यांना खंडणी न दिल्यास तुमची बातमी तयार करतो,माहीत अधिकार देतो आशा प्रकारच्या धमक्या देऊन फेक बातम्या तयार करत असत.आशा एका प्रकारात श्री क्षेत्र आजूबाई महाविद्यालय अन्वा येथील प्राचार्यांना त्रास दिला त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दिली.त्याप्रमाणे पोलीस यंत्रणेने या गंभीर गुन्हयाची दाखल घेऊन आरोपींच्या टोळीचा शोध घेतला.यातील प्रमुख विश्वास ढसाळ व प्रल्हाद बोरसे याना अटक केली असून दोन फरार आहेत.याच्या वर भा.द.वि.188,384,385,341,394,506,34 अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे.पारध पोलिसांनी भोकरदन न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना पी.सि.आर.(PCR) मंजूर करून त्यांची पोलीस कोंठडीत रवानगी केली आहे.सदरील दोन्ही आरोपी हे पोलीस स्टेशन येथे अटक असून या गुन्ह्यात इतर दोन आरोपी फरार आहेत. यामध्ये चॅनल व त्यांच्या प्रतिनिधित्वा संबंधि संशय असून इतर रेकॉर्ड आणि गुन्ह्याचा तपास पारध पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुदाम भागवत व श्री माळी हे करत आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...